राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

 

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम योजनेची कार्यपद्धती

सहसंचालक,आरोग्य सेवा, (हिवताप,हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे हे राज्यस्तरावर कार्यक्रम प्रमख आहेत व ते योजनेवर नियंत्रण ठेवतात. सहसंचालक, आरोग्य सेवा, (हिवताप,हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे -६ यांना सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे व राज्य कीटकशस्त्रज्ञ साहाय्य करतात.त्याचप्रमाणे प्रादेशिक स्तरावर सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा,(हिवताप) व जिल्हास्तरावर जिल्हा हिवताप अधिकारी हे सहाय्य करतात.

अनुदान पद्धती :-

राज्य शासन आणी राष्ट्रीय ग्रामीण आरोय अभियान यांच्याकडून योजनेस अनुदान उपलब्ध होते

केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अधिनराहून राज्यामध्ये राबविण्यात येणा-या विविध हिवताप विरोधी उपाययोजना खालीलप्रमाणे

(अ)सर्वेक्षण

  • नवीन हिवताप रुग्ण शोधण्यासाठी राज्यातील सर्व वाडया, वस्त्या,पाडे, गावपातळीवर कर्मचार्यांमार्फतसर्वेक्षण
  • आरोग्य कर्मचार्यांमार्फत कीटकशास्त्रीय सर्वेक्षण.
  • “आशा” स्वयंसेविका / पाडा स्वयंसेविकांचा स्थानिक स्तरावर कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग

    (ब) प्रयोगशाळा

  • जिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावरही प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध.
  • प्रत्येक प्रा.आ.केंद्राच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद मंजूर.
  • दुर्गम व अतिदुर्गम भागात हिवतापाच्या तत्काळ निदानासाठी रॅपीड डायग्नोस्टीक किट्स चा पुरवठा
  • पी.फॅल्सिफेरम या गंभीर स्वरूपाच्या हिवतापाचे शीघ्र निदान व उपचारासाठी “आशा” कार्याकार्तीना प्रशिक्षण.
  • डेंगू/ चिकुनगुन्या आजाराच्या निदानासाठी राज्यात २३ सेंटीनल सेन्टर्स असून त्यापैकी ८ सेन्टर्स नवीन स्थापन केले असून २०११-१२ पासून कार्यान्वित झाली आहेत.

(क)डास नियंत्रणासाठी उपाययोजना

  • किताक्नाषक फवारणी – राज्यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावांमध्ये सिंथेटिक प्राय्रेथ्राईड गटातील किटकनाशाकाची घरोघर फवारणी करण्यात येते.
  • आळीनाशक फवारणी – नागरी हिवताप योजने अंतर्गत राज्यातील निवडक १५ शहरांमध्ये (मुबईसह) डासोत्पत्ती स्थानावर टेमिफॉस, बी.टी.आय या आळीनाशकाची फवारणी करण्यात येते.राज्यात नागरी हिवताप योजनेत समाविष्ठ असलेली १५ शहरे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, अकोला, पुणे, व मुंबई
  • जीवशास्त्रीय उपाययोजना – किटकनाशकामुळे होणा-या प्रदूषणाचा विचार करून राज्यामध्ये योग्य डासोत्पत्ती स्थानामध्ये डासआळी भक्षक गप्पीमासे सोडण्यात येतात.सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविण्यात येत आहे.
  • किटकनाशक भारीत मच्छरदाण्या – वर्ष २००५ पासून आतापर्यंत ५२७१ संवेदनशील गावांमध्ये १०.८७ लाख मच्छरदान्यांचे वाटप करण्यात आले आहे.त्यापैकी ५ लाख मच्छरदाण्या सुस्थितीत आहेत.

   (ड)  प्रशिक्षण – वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्वेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांना किटकजन्य रोगांबाबत दरवर्षी नियमित प्रशिक्षण देण्यात येते.

   (इ) मूल्यमापन व सनियंत्रण-  राष्ट्रीय किटकजय रोग नियंत्रण कार्यक्रम योग्य रीतीने राबविला जावा याकरिता राज्य/ जिल्हा/ तालुका/ प्रा.आ.केंद्र स्तरावरून क्षेत्रीय भेटीद्वारे मूल्यमापन व सनियंत्रण केले जाते.

  (ई) हिवताप प्रतिरोध महिना – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जनतेमध्ये हिवताप कार्क्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी जून मध्ये हिवताप प्रतिरोध महिना जिल्हा हिवताप अधिकारी मार्फत विविध उपक्रमाद्वारे गाव पातळीपर्यंत राबविण्यात येतो.विविध उपक्रम – पदयात्रा, ग्रामसभा, प्रभातफे-या, कार्यशाळा, प्रशिक्षण, विविध माध्यमाद्वारे (वृत्तपत्र, भित्तीपत्रिका, भिंतीवरच्या म्हणी, आकाशवाणी, दूरदर्शन, केबल, ट.व्ही. )ई. द्वारे प्रसिद्ध केले जाते.