विशेष घटक योजना
अनुसूचित जाती/ नवबौद्ध लाभार्थीना २ देशी दुभत्या / २ संकरित दुभत्या गायी / २ म्हशीं गट पुरवठा करणे (वि. घ. यो.)
योजनेचे स्वरूप
राज्याच्या ग्रामीण भागात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी २ देशी दुभत्या / २ संकरित दुभत्या गायी / २ म्हशींचे अनुसूचित जाती/ नवबौद्ध लाभार्थीना गट पुरवठा करणे.
- लाभार्थीस २ देशी दुभत्या / २ संकरित दुभत्या गायी / २ म्हशीं गट प्रति जनावर किंमत गाय रु.७०,०००/-,प्रति म्हशी रु.८०,०००/- च्या ७५ टक्के अनुदानावर पुरवठा करणे.
- सदरील जनावरांचा विमा ५.७५% + १०.३% या दराने तीन वर्षाचा विमा करण्यात येईल.
- स्वहिस्सा २५% रक्कम लाभार्थीने स्वत उभा करावी लागेल.
- बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या (अनु. जातीसाठी ५% लाभार्थी हिस्सा व २०% बँकेचे कर्ज) लाभार्थयास या योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
लाभार्थी:
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी , अत्यअल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी , सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले) , बचत गटातील महिला (अ. क्र. १ ते ४ मधील) , क्र. १ ते ४ मधील ३०% महिला लाभयार्थ्याना प्राधान्य , क्र. १ ते ४ मधील ३०% विकलांग लाभयार्थ्याना प्राधान्य
फायदे:
सदरील योजनेतून अनुसूचित जाती/ नवबौध्द लाभार्थींना प्रति लाभार्थी 2 देशी/ संकरित दुधाळ गायी/ म्हशी यांचा 75% शासकिय अनुदानावर पुरवठा करण्यात येतो. गाय गटाची एकूण किंमत 156850/- इतकी असून, त्यापैकी 75% शासकिय अनुदानाची रक्कम रु. 117638/- रुपये राहिल व उर्वरित 25% लाभार्थी हिस्सा रु. 39213/- इतकी रक्कम भरावी लागेल. म्हैस गटाची एकूण किंमत 179258/- इतकी असून, त्यापैकी 75% शासकिय अनुदानाची रक्कम रु. 134443/- रुपये राहिल व उर्वरित 25% लाभार्थी हिस्सा रु. 44814/- इतकी रक्कम भरावी लागेल.
अर्ज कसा करावा
ऑनलाइन मोड www.ahmahabms.com या पोर्टलवर. • जून जुलै महिन्यात ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतील. अर्ज स्विकारण्यासाठी एक महिन्याची मुदत राहील. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.