विशेष घटक योजने अंतर्गत् (अनुसूचित जाती व नवबौध्द) लाभार्थीना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.
योजनेचा उद्देश :-
अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थीना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे
योजनेचे स्वरुप :-
• प्रशिक्षण वर्ग हा तीन दिवसांचा राहील.
• एका लाभार्थीवर तीन दिवसा करिता रुपये 1000/- पर्यंत खर्च करण्यात येईल.
• चहा, नाष्टा, जेवन प्रतिदिन रुपये 100/-, जाण्या येण्याचा खर्च (एसटी/रेल्वे तिकीट पाहून) 100/-, पेन, नोंदवही, छापील तांत्रिक माहीती रुपये 100/-, दृकश्राव्य व्यवस्था (प्रचार, बॅनर्स , चार्टस्) प्रशिक्षण बैठक व्यवस्था हॉल इ. अनुषंगीक खर्च रुपये 500/-
• रु. 1000/- प्रति लाभार्थी खर्च व उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेत लाभार्थी संख्या ठरविण्यात येईल.
• प्रशिक्षण जनावरांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात येईल, तथापी प्रशिक्षण प्रक्षेत्रावर घेणे शक्य नसल्यास इतर ठिकाणी घेण्यात येईल.
लाभार्थी:
लाभार्थी निवडतांना एकूण लाभार्थीच्या 30 टक्के महिला लाभार्थी निवडीस प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी निवडतांना 03 टक्के लाभार्थी हे वकिलांग प्रवर्गातील राहतील. लाभार्थी निवडतांना संबंधीत ग्राम पंचायतीचे शिफारसपत्र प्राप्त करुण घेणे बंधनकारक राहील. योजनेची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, हे करतील. पात्र लाभार्थी कडून विहीत नमुन्यातील अर्ज संबंधीत पशुवैद्यकीय संस्थे मार्फत संकलीत करुन पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, यांचेकडे सादर करतील.
फायदे:
विनामूल्य प्रशिक्षण देणे
अर्ज कसा करावा
पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिति यांच्याशी संपर्क साधावा.