ओटीएसपी अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थीना शेळी गटाचा पुरवठा करणे
योजनेचे स्वरूप:
सदरील योजनेतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना (10+1) शेळी गट यानुसार 75% शासकिय अनुदानावर पुरवठा करण्यात येतो. गटाची एकूण किंमत एकूण 01,03,545/- इतकी असून, त्यापैकी 75% शासकिय अनुदानाची रक्कम रु. 77,659/- रुपये राहिल व उर्वरित 25% लाभार्थी हिस्सा रु. 25,886/- इतकी रक्कम लाभार्थींना भरावी लागेल.
लाभार्थी:
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी , अत्यअल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले), बचत गटातील महिला (अ. क्र. १ ते ४ मधील), क्र. १ ते ४ मधील ३०% महिला लाभयार्थ्याना प्राधान्य , क्र. १ ते ४ मधील ३०% विकलांग लाभयार्थ्याना प्राधान्य
फायदे:
१० शेळ्या/मेंढ्या आणि १ बोकड/मेंढ्याचे युनिट, अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना- ७५% अनुदान. उस्मानाबादी/संगमनेरी जातीच्या, माडग्याल किंवा दख्खनी मेंढ्या किंवा इतर स्थानिक, स्थानिक प्रजातींच्या शेळ्या आणि बोकडांचे युनिट. गट किंमत उस्मानाबादी/संगमनेरी शेळी रु. १,०३,५४५/- स्थानिक शेळी रु.७८,२३१/-, माडग्याल मेंढी रु.१,२८,८५०/- डेक्कानी आणि स्थानिक मेंढी रु.१,०३,५४५/-
अर्ज कसा करावा
ऑनलाइन मोड www.ahmahabms.com या पोर्टलवर. जून जुलै महिन्यात ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतील. अर्ज स्विकारण्यासाठी एक महिन्याची मुदत राहील. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.