बंद

    राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अंशत: ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढीपालनाव्दारे शेतक-यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.

    • तारीख : 27/04/2023 -

    १० शेळ्या/ मेंढ्या व १ बोकड/ नर मेंढा यांचे गट वाटप, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, उस्मानाबादी /संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच मडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक मेंढ्या गटांचे वाटप करण्यात येते.

    लाभार्थी:

    दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी , अत्यअल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले) , बचत गटातील महिला (अ. क्र. १ ते ४ मधील), क्र. १ ते ४ मधील ३०% महिला लाभयार्थ्याना प्राधान्य , क्र. १ ते ४ मधील ३०% विकलांग लाभयार्थ्याना प्राधान्य

    फायदे:

    १० शेळ्या/ मेंढ्या व १ बोकड/ नर मेंढा यांचे गट वाटप, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, उस्मानाबादी /संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच मडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक मेंढ्या गटांचे वाटप करण्यात येते

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन मोड www.ahmahabms.com या पोर्टलवर. जून जुलै महिन्यात ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतील. अर्ज स्विकारण्यासाठी एक महिन्याची मुदत राहील. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.